राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश ,बूट व मोज्यांसाठी शासनाकडून प्राप्त झाला वाढीव निधी.विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे वातावरण.नियम व आटी वाचा सविस्तर खाली.
केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश योजनामधून शासकीय तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते ८ वीच्या वर्गातील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातींची सर्व मुले आणि दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेशाचा लाभ देण्यात येतो. सद्य:स्थितीत उपरोक्त शाळांमधील फक्त दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळत नाही. सदर विद्यार्थ्यांनादेखील मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्याचा तसेच, मोफत गणवेश योजनेंतर्गत सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बुट व दोन जोडी पायमोजे देण्याचा निर्णय शासनाने संदर्भाचीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये घेतला आहे. सदर बाबींकरीता एकुण रु. १५८.५२ कोटी इतका निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती..
Interested