केंद्रप्रमुख पदासाठी रजा रोखीकरण केल्यास किती आर्थिक भार पडणार ह्यासाठी शासनाच्या प्रशासनास सूचना.शासनाची आर्थिक माहिती गोळा करण्यास सुरुवात.
विषय:- केंद्र प्रमुखांना सेवानिवृत्तीच्या वेळी संचित अर्जित रजेचे रोखीकरण अनुज्ञेय करण्याबाबत.
उपरोक्त विषयाबाबत केंद्रप्रमुखांना दीर्घ सुट्टी कालावधीतील अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित रजा अनुज्ञेय करुन सदर अर्जित रजेचे रोखीकरण करण्याबाबतच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील केंद्रमुखांची मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील तसेच कार्यरत असलेल्या केंद्रप्रमुखांचा नियुक्ती दिनांक व सेवानिवृत्ती दिनांकाचा तपशील शासनास सादर करावा.तसेच सन २०२२ पासून सदर केंद्रप्रमुखांना अर्जित रजा व सदर अर्जित रजेचे रोखीकरण द्यावयाचे झाल्यास त्यासाठी लागणारा अंदाजित आर्थिक भार किती येईल, याचाही तपशील शासनास est14- rdd@mah.gov.in या ई-मेल वर तात्काळ सादर करावा, ही विनंती.