1.मूळ पेन्शन शोधता येईल. (ONLINE PENSION CALCULATOR)
2.ठराविक वयानंतर पेंशन मध्ये किती वाढ होणार आहे त्याचे CALCULATOR खाली दिलेले आहे.
3. माहिती राज्यातील सर्व पेन्शन धरकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.सर्वाना पाठवा.
पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या खात्यात पेंशन जमा होत असते. परंतु राज्यातील सर्व पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना दर वर्षी दोनदा महागाई भत्ता वाढ मिळत असतो. त्यामुळे साहजिकच पेन्शन मध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे ,आणि वाढलेल्या महागाई भात्ताची थकबाकी किती मिळणार, ह्याची उत्सुकता सर्व पेन्शन धारकांना लागलेली असते. वाढलेल्या महागाई भात्यामुळे पेन्शन मध्ये झालेली वाढ किंवा महागाई भात्याची थकबाकी काढण्यासाठी मूळ पेन्शन माहिती होणे गरजेचे आहे. परंतु बर्याच पेन्शन धारकांना मूळ पेन्शन माहिती नसते.त्यांना फक्त खात्यात जमा होणारी पेन्शन हि माहिती असते कारण टी प्रत्येक महिन्यात Bank Account ला जमा होत असते. त्यामुळे आम्ही आता असे ONLINE PENSION CALCULATOR आणले आहे ज्याच्या मदतीने कोणत्याही पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना त्यांची मूळ पेंशन माहिती करून घेता येईल.
खाली दिलेली माहिती भरावी व आपल्याला आपली मूळ पेन्शन मिळेल.
राज्यातील जे पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांचे वय 80 च्या पुढे गेल्यास त्यांना वित्त विभाग शासन निर्णय दि १६ जानेवारी २०२४ नुसार पेन्शन मध्ये खूप मोठी वाढ मिळते. वय वर्ष 80 च्या पुढील सर्व पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांना तब्बल 100% पर्यंत पेन्शन वाढीचा फायदा मिळतो. त्यामुळे बरेच असे पेन्शन धारक आहेत कि त्यांचे प्रश्न असते कि आम्हाला पेन्शन मध्ये किती वाढ मिळणार आहे किंवा आमची मूळ पेन्शन कधी वाढणार आहे. तर राज्यातील अश्या पेंशन धारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतन धारक यांच्या साठी आम्ही मूळ पेन्शन वाढ CALCULATOR घेऊन आलो आहोत ज्याच्या मदतीने आपण आपली पेन्शन वाढ पाहू शकता. (संदर्भासाठी FINANCE DEPARTMENT GR)
पेन्शन वाढ माहिती करून घेण्यासाताही आपल्याला आपली मूळ पेन्शन माहिती असणे गरजेचे आहे, आणि ते माहिती करून घेण्यासाठी आपण वर मूळ पेन्शन CALCULATOR दिलेले आहे त्याचा वापर करावा व एकदा का मूळ पेन्शन माहिती झाली तर आपणपण ह्या खालील CALCULATOR च्या मदतीने आपली वाढ माहिती करून घेवू शकता.