नागपंचमी हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमी ह्या सण पवित्र श्रावण महिन्यात येत असल्याने ह्या सणाला अनन्य साधारण महत्व आहे. श्रावण महिन्यात हा सण येत असल्याने ह्या सणाला सापांची पूजा केली जाते.
नागपंचमी ह्या सणानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात यावी असे आदेश कक्ष अधिकारी,महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर/औरंगाबाद/पुणे/कोकण तसेच जिल्हाधिकारी,नंदुरबार/नाशिक/धुळे/जळगाव/ठाणे/पालघर/रायगड/पुणे/नांदेड/हिंगोली/अमरावती/ नागपूर/गोंदिया/चंद्रपूर/गडचिरोली/यवतमाळ/भंडारा यांना दिले आहेत. त्यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत.
आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, दिनांक ९ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासीबहुल क्षेत्रात संबंधित विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त शासन निर्णयाच्या अनुषंगाने स्थानिक सुट्टी देण्याबाबत निर्णय घ्यावा.
त्यामुळे जर संबंधित विभागातील जिल्हाधिकारी तथा विभागीय आयुक्त यांनी सकारात्मक निर्णय घेतल्यास उद्या दि ९ ऑगस्ट दिनी नागपंचमी निमित्य सुट्टी असू शकते.