
राज्यसरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांचा महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.महागाई भत्ता फेब्रुवारीच्या वेतनापासून वाढीव दराने म्हणजे ५३% दराने देण्यात यावा ह्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा एक अत्यंत महत्वाचा शासन आदेश दिनांक २५ फेब्रुवारी २०२५ रोजी निर्गमित झाला आहे.परंतु फेब्रुवारी महिन्याचे वेतन देयके कोषागार कार्यालयात आधीच सदर झाले असल्यास आपल्याला वाढीव महागाई भत्ता व त्याची थकबाकी मार्च २५ च्या पगारात मिळणार आहे. महागाई भत्ता 50%च्या वर गेल्यास घर भाडे भात्यात सुधारणा करणे संदर्भात महाराष्ट्र शासनच्या वित्त विभागच शासन आदेश फेब्रुवारी २०१९ मध्ये शासन आदेश निर्गमित झालेला आहे.याचा अर्थ असा कि आपल्याला मार्च २०२५ च्या पगारात वाढीव महागाई भत्ता ,वाढीव घरभाडे भत्ता आणि महागाई भत्ता याची मागील एकूण 8 महिन्याची महागाई भत्ता थकबाकी असा आर्थिक लाभ मिळणार आहे.
महागाई भत्ता ५३% झाल्यास पगारात किती वाढ होईल व थकबाकी किती मिळेल हे सर्व चेक करा ,आता 1 मिनिटात….. Online DA Arrears calculator.
महागाई भत्ता 53% झाल्यास तुमच्या पगारात किती रुपयांची वाढ होणार आहे ते आता करा चेक ..
1) तुमचे सध्याचे मुळ BASIC टाका .
2) HRA निवडा
३)CLA लागू असल्यास टाकावा
4) वाहतूक भत्ता टाकावा
